ठाकरे गटाच्या खासदारावर डंपर घालण्याचा प्रयत्न

धाराशीव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | धाराशीवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर आज सकाळी डंपर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यातून ते सुदैवाने बचावले आहेत. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

खासदार ओमराजे निंबाळकर हे गोवर्धनवाडी येथे राहतात. आज सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकसाठी राहत्या घरापासून काही अंतरावरच गेले होते. घरी परत येत असतांना पाठीमागून येणार्‍या एका भरधाव डम्परचा आवाज त्यांना आला. त्यांनी पाठीमागे वळून पाहिले तर डम्पर मोठ्या वेगाने आपल्याचं दिशेने येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. डावी बाजू सोडून डम्पर उजव्या बाजूने भरधाव वेगाने येत होता. यावेळी प्रसंगावधान राखत ओमराजेंनी उडी घेतली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले.

 

दरम्यान, डम्परचा पाठलाग करून चालकाला अटक करण्यात आली असून डंपरचालकाविरुद्ध कलम २७९, ३३६, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. तर आता डंपर घालण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content