Home राजकीय ठाकरे कुटुंबाला टार्गेट करू नका : शिंदे यांचे सहकार्‍यांना निर्देश

ठाकरे कुटुंबाला टार्गेट करू नका : शिंदे यांचे सहकार्‍यांना निर्देश

0
29

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे अथवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर टीका करू नये असे सक्त निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकार्‍यांना दिल्याचे वृत्त आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील काही आमदार हे सातत्याने ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कान टोचले आहेत. काल उशीरा झालेल्या बैठकीत त्यांनी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे वा अन्य सदस्यांवर बोलू नये. पक्षाचे प्रवक्ते याबाबत भाष्य करतील असे त्यांनी सुनावले. यामुळे आता शिंदे गट सावध भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.

अलीकडच्या काळात बंडखोर गटातील काही आमदार व विशेष करून शहाजी पाटील आणि संजय शिरसाठ हे सातत्याने ठाकरे कुटुंबावर टीका करतांना दिसत आहेत. तर आदित्य ठाकरे देखील त्यांना आधी राजीनामा देण्याचे सांगत त्यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. या पार्श्‍वभूमिवर, दोन्ही गटांमध्ये वातावरण चिघळता कामा नये असे मुख्यमंत्री शिंदे यांनी बजावले आहे.


Protected Content

Play sound