ट्रम्प यांना पराभव मान्य ; जो बायडेन यांना सत्ता स्थापण्यासाठी निमंत्रण

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । जो बायडेन हे अमेरिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय होऊन डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आपल्या पदावर अडून राहिले होते आणि आपला पराभव मान्य करण्यास तयार नव्हते. पण आता अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तांतरणाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे.

अमेरिकेतील निवडणुका होऊन तीन ते चार आठवडे उलटले असून डोनाल्ड ट्रम्प निकाल आपल्या बाजूने येईल असा विश्वास वारंवार व्यक्त करत होते. निकाल आल्यानंतर ट्रम्प यांनी अनेकदा जो बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षावर निशाणा साधला आहे. निवडणुकीचा निकाल स्पष्ट असतांना देखील ट्रम्प पराभव मान्य नव्हता. याकरिता त्यांनी कायदेशीर मार्गही निवडला होता. पण तिथेदेखील त्यांच्या पदरी निराशाच आली. अखेर डोनाल्ड ट्रम्प पराभव मान्य करताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या जीएसएला सत्तांतरणाच्या प्रक्रियेला परवानगी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे करण्याची गरज आहे ते करा असं सांगितलं आहे. यानंतर अमेरिकेच्या जीएसए एमिली मर्फी यांनी जो बायडेन यांना पत्र लिहिलं असून सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत जीएसए एमिली मर्फी यांचे आभार मानले असून त्यांना धमकावलं तसंच छळ केल्याचाही आरोप केला आहे. आपण त्यांच्यासोबत किंवा त्यांचे कुटुंबीय आणि जीएसच्या कर्मचाऱ्यांसोबत असं होताना पाहू शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला लढा सुरुच राहील सांगताना विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे.

 

Protected Content