टोळी येथील मयत मुलीच्या कुटुंबियांना शासकीय मदत द्या

 

जळगाव,प्रतिनिधी । शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षकांना राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती (नफ) या संघटनेतर्फे पारोळा तालुक्यातील टोळी येथील मयत मुलीच्या कुटुंबियांना शासकीय मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती तरुणांवर हल्ले करुन त्यांची हत्या करणे, तसेच अल्पवयीन मुली, महिलांवर अन्यायकारक अत्याचार करणे या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील टोळी येथे घडली. येथील अनुसुचित जातीच्या मुलीवर तीन नराधामांनी सामुहिक अत्याचार करुन तिला विष पाजून जीवे मारलेले आहे. यात एका महिलेचाही सहभाग आहे. या सर्व दोषींवर खूनासह अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हे नोंदवून संबंधितांना त्वरीत अटक करावी, तसेच पिडीत मुलीच्या कुटुंबांला पोलीस संरक्षण देवून शासकीय मदत द्यावी असे निवेदनात नमूद आहे. हे निवेदन शुक्रवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी भारतीय बौध्द महासभा जिल्हाध्यक्ष विनोद रंधे, संविधान बचाव संघर्ष समिती अध्यक्ष विजय सुरवाडे, जळगाव तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा सुकलाल पेंढारकर, असंघटीत कामगार चे अध्यक्ष खुशाल सोनवणे, बहुजन मुफ्ती मोर्चाचे देवानंद निकम, भारत मुक्ती मोर्चाचे रविंद्र सोनवणे, भारतीय विद्यार्थी मोर्चाचे विशाल अहिरे, बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे उपाध्याक्ष सिध्दार्थ सोनवणे हे उपस्थित होते.

Protected Content