जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टॉवर चौक परिसरामध्ये असलेल्या प्रभात सोडा दुकानासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवार २ जून रोजी दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रिंग रोडवरील शंकरवाडी परिसरात ललित चौधरी (वय-५०) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार २ जून रोजी सकाळी १० वाजता ते बाहेरगावी जाण्यासाठी दुचाकी (एमएच १९ एपी ७९२५) ने निघाले. जळगाव शहरातील टॉवर चौकातील प्रभात सोडा या दुकानासमोर त्यांनी दुचाकी पार्क करून लावली. त्यांच्या जवळील असलेले पैशांचे सुट्टे करण्यासाठी दुकानात गेले. अवघ्या १५ मिनिटात अज्ञात चोट्याने ३० हजार रुपये किमतीची पार्किंगला लावलेले दुचाकी चोरून नेली. ललित चौधरी यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर दुपारी १२ वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.