यावल प्रतिनिधी । तालुक्यातील टेंभी गावातील एका शेतकऱ्याच्या यावल भुसावळ मार्गावरील असलेल्या पत्र्याच्या शेड मधील सुमारे ६० हजार रुपये किमतीचे दोन बैल चोरून नेले. यावल पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २९ ऑक्टोबरच्या १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेलेन्द्र रमेश पाटील (वय-३१ रा. टेंभी ता. यावल) शेतकऱ्याच्या यावल भुसावळ रोडावरील टेंभी गावाजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडच्या गोठयातून ६० हजार रुपये किंमतीचे दोन बैल चोरून नेले. शैलेन्द्र पाटील यांनी पोलिसात फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. कैलाससिंग उमरसिंग हे करीत आहे.