नाशिक वृत्तसंस्था | देवळा तालुक्यातील मेशी येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक बस अचानक टायर फुटल्याने कठडा तोडून विहिरीत पडली. या अपघातात चार प्रवासी ठार तर सुमारे ३५ जण जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, मालेगाव-कळवण बसचे टायर उमराणा-देवळा रस्त्यावर अचानक फुटल्याने बसने एका अँपे रिक्षाला धडक दिली व रिक्षासह
विहिरीचा कठाडा तोडून ती विहिरीत पडली. या अपघातात चार प्रवासी जागेगीच ठार झाले आहेत. त्यात दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. सुमारे ३० ते ३५ प्रवासी गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी चांदवड देवळा विधानसभा सदस्य आ.डॉ.राहुल आहेर स्वतः विहिरीत उतरून मदत करत आहेत.