पाचोरा – नंदू शेलकर | शहरातील टायगर किड्सच्या चिमुकल्यांची आज ११ डिसेंबर रोजी पाचोरा पोलिस स्टेशनला भेट देऊन पोलिस स्टेशनमध्ये चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाची माहिती जाणुन घेतली.
टायगर किड्सच्या चिमुकल्यांनी पोलीस स्टेशनची कार्यप्रणाली जाणून घेतली. याप्रसंगी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील, सचिन पवार, गोपनीय शाखेचे नितीन सुर्यवंशी, सुनिल पाटील, टायगर किड्सचे संचालक रोहन पाटील, शिक्षिका सोनाली पाटील, प्रेमलता वर्मा, सोनाली, येवले, स्वाती वाणी, रितीक पाटील, विकी चव्हाण, शांताराम चौधरी उपस्थित होते. शहरातील टायगर किड्सच्या ज्युनिअर व सिनियर के. जी. मधील ४ ते ६ वयोगटातील चिमुकल्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये भेट देऊन पोलिस स्टेशनमध्ये चालणाऱ्या दैनंदिन कामकाजाची माहिती जाणुन घेतली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे, गोपनीय शाखेचे नितीन सुर्यवंशी, सुनिल पाटील यांनी पोलिस स्टेशनच्या विविध विभागाबदद्ल सखोल माहिती दिली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये माहिती जाणुन घेतांना उत्साह बघावयास मिळाला.