चाळीसगाव, प्रतिनिधी | आ. मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील प्रभाग क्रमांक पाच येथे भुमिगत गटारीच्या कामांचे भूमिपूजन आज स्थानिक रहिवाशांच्या शुभहस्ते करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्याचे युवा आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध झाल्याने तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील प्रभाग क्र. ५ मधील टिळक नगर येथे भूमिगत गटारीच्या कामाचे भूमिपूजन आज बुधवार रोजी स्थानिक रहिवाशांच्या शुभहस्ते करण्यात आले. याबाबत टिळक नगरातील नागरिकांनी आमदारांचे आभार मानले आहेत.
यावेळी प्रभाग क्र. पाचचा ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे, विजय पाटील, सुमनताई माळी, शरद रोकडे, विजय पाटील, पुरुषोत्तम येवले, राहुल वाघ, निखिल अमृतकर, अमोल गवळी व परिसरातील अनेक महिला उपस्थित होत्या. दरम्यान विकास कामात दिरंगाई न करता तुम्ही भूमिपूजन करा मी लोकार्पणला येईल असे आमदार मंगेश चव्हाण यांनी दुरध्वनी वरून कळविले.