टाकरखेडा शाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टाकरखेडा जिल्हा परिषद मराठी शाळेत जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच शालेय व्यवस्थापन समितीची मिटींग घेण्यात आली.

 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी टाकरखेडा जिल्हा परिषद मराठी शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर हे होते. याप्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थी ऋषीकेश एकनाथ सुरळकर तसेच शाळेचे ग्रेडेड मुख्याध्यापक पी. टी. पाटील व उपशिक्षक शांताराम पाटील यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आला. यावेळी बाला उपक्रम राबविणे, शाळेचा युडायस भरणे , टाकरखेडा शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड झाल्याबद्दल त्यासाठी योग्य ती कार्यवाही करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमास शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास वराडे, शालेय समितीचे उपाध्यक्ष रुपाली आगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पाटील, शिक्षणतज्ञ तथा पोलीस पाटील समाधान पाटील, सदस्य शिवाजी डोंगरे, विलास साळुंखे, गोपाल दांडगे,सुधाकर गोसावी, पालक मोहन डोंगरे, आत्माराम सुरळकर, श्रावण भोई, संतोष भोई तसेच शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, रवींद्र चौधरी, जयंत शेळके, शांताराम पाटील, श्रीमती जयश्री पाटील, श्रीमती छाया पारधे, रामेश्वर आहेर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवाजी पाटील यांनी केले व आभार  जयंत शेळके मानले.

Protected Content