रांची (वृत्तसंस्था) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर घरी जाणाऱ्या एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची झारखंडमध्ये घडली आहे. आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
झारखंडमधल्या दुमका शहरात पीडित विद्यार्थिनी राहत राहते. लॉकडाऊन झाल्याने महाविद्यालय बंद करण्यात आले होते. रस्त्यांवर वाहनांनी वर्दळही बंद होती. २४ मार्चला ती एका मैत्रिणीसह घरी परतत असताना गावच्या वेशीवर सोडून मैत्रीण निघून गेली. सोबतीसाठी तिने आपल्या घरातील सदस्यांना त्या ठिकाणी बोलावले होते. संध्याकाळपर्यंत कुटुंब न आल्याने तरुणीने गावातील मित्र विक्की उर्फ प्रसन्नजित हंसदा याला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले. हा तरुण त्याचा गावातील रहिवासी असल्याने लागलीच मित्रासोबत दुचाकीसह तरुणी उभी असलेल्या वळणावर पोहोचला. विकीने घरी जाण्याऐवजी दुसऱ्या वाटेवरून दुचाकी घेतली. काही अंतर गेल्यानंतर विकीने निर्जन जंगलाजवळ दुचाकी थांबविली आणि शौचालयाला जातो, असे सांगितले. पीडिता विकीच्या अज्ञात मित्रासह बराच काळ निर्जन जंगलात उभी होती. त्यानंतर विक्कीने मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आठ तरुण तोंडाला कपडा बांधून आले आणि त्यांनी तरुणीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रात्रभर जंगलात बेशुद्धावस्थेत सोडून ते नराधम तिथून पसार झाले. दुसर्या दिवशी २५ मार्चला सकाळी ती जंगलातून कशीबशी रस्त्यावर आली, तेव्हा गावकऱ्यांनी तिला पाहिले आणि कुटुंबीयांना माहिती दिली. प्रसंगी आई, वडील आणि भाऊ आले आणि तिला उचलून घरी घेऊन गेले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेवर नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.