जळगाव प्रतिनिधी । शेतातील पिकाचे कमी उत्पन्न व सोसायटीच्या कर्जबाजारीतून तरूण शेतकऱ्याने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, महेंद्र एकनाथ पाटील (वय-26) रा. ममुराबाद ता.जि.जळगाव या तरूण शेतात पाणी भरणा करण्यासाठी जातो असे सांगून सकाळी 7 वाजता घरून निघाला होता. दुपारी 12 वाजेच्या सुमारास आई व वडील बैलगाडीने शेतात आल्यावर मुलाने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आला. दरम्यान, शेतकऱ्याने शेतातील पिकाचे कमी उत्पन्न व सोसायटीच्या कर्जबाजारीतून आज दुपारी 2 वाजेच्या समारास आत्महत्या केल्याचे मेहुणे संतोष सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. मयत महेंद्र हा फावल्या वेळात नारळ विक्री करण्याचे काम करत होता. गेल्यावर्षी त्याने शेतात विहीर खोदली होती. विद्यूत पंपासाठी लागणारी विजेचे 12 विद्यूत खांबे स्व:खर्चाने टाकले होता. यावर्षी चांगले उत्पन्न न आल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.