झांबरे विद्यालयात झटपट फोटोग्राफी स्पर्धा

जळगाव, प्रतिनिधी  ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी झटपट फोटोग्राफी स्पर्धा घेण्यात आली. 

कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थी दिड वर्षांपासून घरूनच शिक्षण घेत आहेत, त्यामुळे मोबाईलशी जास्त जवळीक निर्माण झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घराच्या परिसरातील निसर्गाचा, श्रावण महिन्यातील पावसाने ओथंबलेल्या निसर्ग सौंदर्याचा अल्टीमेट फोटो स्पर्धा घेण्यात आली. यात ९० विद्यार्थी सहभागी झाले. यात जिग्नेश महाजन, चैतन्या सपकाळे, साक्षी बाविस्कर, खुशी चौधरी, कुलश्री फक्कड, भक्ती वाणी, निशु चौधरी, तेजस बोंडे, धवल बडगुजर यांनी काढलेले फोटो उल्लेखनीय होते. मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले . कार्यक्रमासाठी सतिश भोळे ,पराग राणे यांनी सहकार्य केले.

Protected Content