ज्योतिष शास्त्राच्या प्रस्थापित मान्यतेविरुद्ध राम मंदिराचे भूमिपूजन होतेय : दिग्विजय सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आज अयोध्येत भगवान रामलल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन वेदद्वारे स्थापित ज्योतिषाशास्त्राच्या प्रस्थापित मान्यतेच्या विरोधात आहे, असे ट्वीट मध्य प्रदेश माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

 

या ट्वीटमध्ये दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा न्हा एकदा राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्न उपस्थित केला आहेत. ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, आज अयोध्येत भगवान रामलल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन वेदद्वारे स्थापित  ज्योतिषाशास्त्राच्या प्रस्थापित मान्यतेच्या विरोधात आहे. परमेश्वरा, आम्हाला क्षमा कर. हे बांधकाम सुरळीतपणे पूर्ण होऊ दे. ही आमची आपल्याला प्रार्थना आहे. जय श्रीराम !. यापूर्वी दिग्विजय सिंह यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तसेच पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती.

Protected Content