ज्योतिर्मयी संस्थेतर्फे स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठेतील ब्राम्हण सभागृहात ज्योतिर्मय संचलित गीतावर्ग, ज्ञानेश्वरी वर्ग, स्त्रोतांजन वर्गाच्या सर्व मैत्रीणींचा बुधवारी १८ जानेवारी रोजी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

ज्योतिर्मयीच्या अध्यक्षा प्रा. रेखा रमेश मुजुमदार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला. एकादशीचे शुभ पर्व असल्याने उपवासाचे पदार्थ आणि जळगावच्या सुप्रसिद्ध भरीतपार्टी सोबत जळगावच्या विविध भजनी मंडळांनी भजने , भारूडे , गवळणी , टिपरीनृत्य , वैयक्तिक कविता , एकपात्री प्रयोग आदींच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

प्रारंभी ज्योतिर्मयीच्या संचालिका प्रा. रेखा मुजुमदार यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ भगिनी वंदना गोखले, सुरभि मंडळाच्या अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, रेखा मुजुमदार यांच्याहस्ते दीपप्रज्वलन होऊन भजनाचा आस्वाद घेऊन सर्व मैत्रिणींनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सूत्रसंचालन मंजुषा राव यांनी केले. समितीच्या मैत्रीणी, सुरभी मंडळ, स्नेहभजनी मंडळ, समर्थमंदिर भजनी मंडळ, स्नेह सखी मंगळागौर गृप मंडळांनी सादरीकरण केले.

आभारप्रदर्शनानंतर पुष्पा साकळीकर यांनी गायलेल्या पसायदानाने कामाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्याणी घारपुरे, अंजली देशमुख, सुजाता देशपांडे, सुजाता गाजरे, स्वाती कुलकर्णी, मंजूषा राव, प्रतिभा पाटील यांनी परिश्रम घेतले. 2023 या नववर्षाचा प्रारंभ स्नेहमीलनाने अत्यंत आनंददायक असा ठरला . तिळगुळ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Protected Content