Home Uncategorized ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन


download 2 1

पुणे (वृत्तसंस्था) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका विद्या बाळ यांचे निधन झाले आहे. त्या 84 वर्षांच्या होत्या.

 

महिल्यांच्या चळवळीला विशेष योगदान देणाऱ्या विद्या बाळ या लेखिका आणि संपादक म्हणूनही प्रसिद्ध होत्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी पुणे आकाशवाणीवर दोन वर्षे कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून नोकरी केली. पुढे १९६४ ते १९८३ या दरम्यान त्यांनी स्त्री या मासिकाच्या साहाय्यक संपादक म्हणूनही काम पाहिले. विद्या बाळ यांनी 1981 मध्ये ‘नारी समता मंच’ या संस्थेची स्थापना केली. ग्रामीण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करणाऱ्या ‘ग्रोइंग टुगेदर’ या प्रकल्पाच्या प्रकल्प-प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. विद्या बाळ यांनी दोन अनुवादित आणि एक रुपांतरित कादंबरी लिहिली आहे.


Protected Content

Play sound