Home क्राईम जोशीवाडा परिसरातून एकाची दुचाकी लांबविली

जोशीवाडा परिसरातून एकाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील जोशीवाडा परिसरातून एका चालकाची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप भगवान कोळी (वय-४३, रा. जोशीवाडा, मेहरूण, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याच्या मालकीची दुचाकी (एमएच १९ बीई १७९७) ही घरघुती कामासाठी ते वापर करतात. दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ ते १६ फेब्रुवारी सकाही ४ वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवार ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.


Protected Content

Play sound