नाशिक (वृत्तसंस्था) कार्यकर्त्यांना नेहमीच पद दिले जाते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मंत्रीपद दिल्याने मला चांगले वाटले. मी एक कार्यकर्ता असून आज मंत्री आहे, बहुतेक उद्या नसेलही. मात्र “जोपर्यंत मोदी आहे, तोपर्यंत मी मंत्रीपदी राहणार. तसेच जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मोदी असतील, असे गंमतीशीर उदाहरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेत रामदास आठवले बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर देशाचं संविधान कसे असते? सांगता येत नाही, असे म्हणत आठवलेंनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा दिला. तर आमच्या दोघात काही गोष्टी ठरले असल्याचे आठवले म्हणाले. आमचा पक्ष जातीवादी लोकांच्या सोबत असल्याचे अनेकजण बोलत असतील. मात्र आम्ही जातीवाद्यांसोबत नसून मोदी यांच्या सोबत असल्याचा खुलासा देखील आठवले यांनी केला.