Home Cities जामनेर जैन युवाचार्य भगवंत यांच्या प्रवचनाचे शेंदूर्णीत आयोजन

जैन युवाचार्य भगवंत यांच्या प्रवचनाचे शेंदूर्णीत आयोजन

0
35

शेंदूर्णी, ता. जामनेर प्रतिनिधी । जैन युवाचार्य भगवंत यांचे शेंदुर्णी येथे उद्या आगमन होणार असून शहरात त्यांच्या प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, आचार्य सम्राट आनंद ऋषीजी म.सा. यांचे शिष्य युवाचार्य भगवंत महेंद्र ऋषीजी म.सा. यांच्यासह हितेंद्र ऋषीजी म.सा., अक्षय ऋषीजी म.सा.,अमृत ऋषीजी म.सा.,अचल ऋषीजी म.सा. आदी ठाणा ५ यांचे यांचे बुधवार ता.६ जानेवारी रोजी मंगल प्रवेश होणार आहे.

पळासखेडा-गोंदेगाव मार्गाने सकाळी ९ वाजता शेंदूर्णी फ्रुटसेल सोसायटी शॉपिंग कॉम्प्लेक्स पासून शेंदूर्णी नगरीच्या वतीने व जैन श्रावक संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर येथीलच माहेश्‍वरी भुवन के के नगर मध्ये २ दिवस प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांना समाज बांधव भगिनींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन शेंदूर्णी जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound