जळगाव प्रतिनिधी । जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमीटेड, भवरलाल ॲण्ड कांताई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने लॉकडॉऊन काळात गरजू, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबासाठी स्नेहाची शिदोरी 2 एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे.
कुटुंबासाठी स्नेहाची शिदोरी २ एप्रिलपासून सुरू करण्यात आल्यानंतर सकाळी ५ हजार ५०० अधिक तर सायंकाळी ३ हजार ५०० हुन अधिक कुटुंबास ही शिदोरी देण्यात येते. आज कांताई हॉल येथील वितरण केंद्रास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन वितरण व्यवस्था समजून घेतली, तसेच आतापर्यंत वितरित झालेले भोजन पाकीट, कोणत्या परिसरात वितरण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ज्युस वाटप आणि इतर माहिती घेऊन जैन उद्योग समूहाच्या या सेवकार्याविषयी आदर व्यक्त केला. यावेळी नगरसेवक अमर जैन, अनिल जोशी व वितरण व्यवस्थेतील जैन इरिगेशनचे सर्व सहकारी उपस्थित होते.