जळगाव (प्रतिनिधी) देशभरात कोरोना विषाणूचा प्रसार आणि प्रादुर्भाव रोखला जावा यासाठी लॉक डाउन करण्यात आले आहे आणि सध्या 14 एप्रिल पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार आहे. या काळात जळगाव शहरातील अशा सर्व कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन,गांधी रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सकाळी 2500 व सायंकाळी 2500 कुटुंबाना आज पासून 2 वेळ सकस भोजन देणे सुरू केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याने अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे, या काळात गोर गरीब ,ज्यांचे हातावर पोट आहे अश्या अनेक कुटुंबाचे भोजना अभावी हाल होत आहेत. जळगाव शहरातील अश्या सर्व कुटुंबातील कोणीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी जैन इरिगेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन,गांधी रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सकाळी 2500 व सायंकाळी 2500 कुटुंबाना आज पासून 2 वेळ सकस भोजन देणे सुरू केले आहे , शहराच्या विविध भागात असलेल्या या कुटुंबाना सकाळी 200 ग्रॅमच्या 4 पोळ्या, 200 ग्रॅम भाजी तर रात्री 400 ग्रॅम सकस खिचडी पुरवण्यात येत आहे. हे सर्व भोजन या सर्व कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी सचिन नारळे यांच्या नेतृत्वाखाली असलेले सार्वजनिक गणेसोत्वव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवा शक्ती फौंडेशन च्या सर्व सदस्याचे सहकार्याने स्नेहाच्या शिदोरी चे आज सकाळी वितरण सुरू करण्यात आले.
या संस्था गेले काही दिवस भोजन वाटप करीत आहेत मात्र भोजन तयार होण्यासाठी लागणारा वेळ वाचावा आणि अधिक गरजू लोकपर्यन्त भोजन दिले जावे यासाठी मध्यवर्ती ठिकाणी भोजन तयार करून शहरातील एका ठिकाणाहून भोजन पाकिटे देण्यात येत आहे. भोजन वाटप करण्याऱ्या सर्व सदस्यांची आरोग्य काळजी घेतली जावी यासाठी आवश्यक ती साधने देण्यात आली आहेत. भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशनच्या वतीने वर्षभर वैद्यकीय, शिक्षण या क्षेत्रातील गरजू लोकांना मदत करण्यात येते. कोरोना आजाराच्या संकटाच्या काळात शहरातील गरजू कुटुंब उपासमारी अभावी आबाळ होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेत जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे ,पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले आणि त्यांच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.
मदत वाटप यंत्रणा
सचिन नारळे यांचे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, अभिषेक पाटील मित्र मंडळ , अमर जैन मित्र मंडळ आणि विराज कावडिया यांच्या युवाशक्ती फौंडेशनच्या मदतीने वाटप यंत्रणा सुसज्ज आहे.