Home राजकीय जे पोटात होतं तेच ओठांवर आले ! : संजय राऊतांचा टोला

जे पोटात होतं तेच ओठांवर आले ! : संजय राऊतांचा टोला

0
33

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केल्याने खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केला होता. यावरून आज खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या पोटात होतं ते ओठावर आलं म्हणूनच त्यांनी औरंगजेबजी असा उल्लेख केला. उद्या कसाबजी म्हणतील. मग अफजल गुरुजी म्हणतील, अफजल खानजी म्हणतील. मग शाहिस्ते खानजी म्हणतील. यावरच त्या पक्षाची रोजीरोटी सुरू आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान, खासदार राऊत यांनी राहूल शेवाळे यांची देखील खिल्ली उडविली. कुणाकडून? बाप रे? होय का? मला वाटलं अणूबॉम्बच पडला मुंबईवर. सोडा हो. अशा नोटिसा आम्हाला रोजच येत असतात, असं म्हणत त्यांनी शेवाळेंची खिल्ली उडवली.


Protected Content

Play sound