चाळीसगाव प्रतिनिधी । येथील जेसीआय चाळीसगाव सिटीच्या वतीने मरणोत्तर अवयवदान जनजागृती व संकल्प मोहीम सुरू करण्यात आली आहे.
येणार्या काळात जेसीआय चाळीसगाव सिटी अवयव दान श्रेष्ठ दान या बोधवाक्य नुसार सर्व तालुक्यांमध्ये मरणोत्तर अवयव दान जनजागृती संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. मरणोत्तर अवयवदानासाठी आवश्यक असणारे फॉर्म उपलब्ध करण्यात आले आहेत. यावेळी अध्यक्ष मुराद पटेल, प्रोजेक्ट चेअरमन आरिफ खाटीक, माजी अध्यक्ष सचिन पवार, देवेन पाटील, गजानन मोरे, धर्मराज खैरनार, विजय गायकवाड आदी याप्रसंगी उपस्थित होते.