जळगाव प्रतिनिधी । सबजेलमधून तीन आरोपींना फरार फरार होण्यासाठी गावठी कट्टा पुरविणाऱ्या संशयित आरोपीला शिंदखेडा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. राहुल गोपाळराव सोनवणे (वय-२२)रा. लालचंद नगर, वारूड रोड शिंदखेडा जि. धुळे. असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, २५ जुलै २०२० रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा उपकारागृहातील तैनात असलेल्या कारागृह रक्षक पंडीत दामु गुंडाळे (वय-४७) च्या डोक्यावर गावठी पिस्तूल लावून आरोपी सागर संजय पाटील (वय-२३) रा. शिवाजी नगर पैलाड, गौरव विजय पाटील (वय-२१) रा. तांबापूरा, अमळनेर, सुशिल अशोक मगरे (वय-३२) रा. लेले नगर पहुर कसबे ता. जामनेर हे कारागृहातून संशयित आरोपी जगदीश पुंडलिक पाटील (वय-१९) रा. पिंपळकोठा ता. पारोळा यांच्या दुचाकीवरून फरार झाले होते. दरम्यान कैद्यांकडे गावठी पिस्तूल आले कसे असा प्रश्न उपस्थित झाला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टप्प्याने दुचाकीवरून पळवून नेणाऱ्या संशयित आरोपी जगदीश पाटीलसह तीन्ही कैद्यांना अटक करण्यात यश आले होते. जिल्हा उपकारागृहात कैद्यांना गावठी कट्टा पुरवणारा मात्र फरारच होता. दरम्यान पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी पथक तयार करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना दिल्यात. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हालचाली सुरू केल्यात. गावठी कट्टा पुरविणारा संशयित आरोपी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले. संशयित आरोपी हा राहत्या गावी शिंदखेडा येथे आला असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. शिंदखेडा बसस्थानकाजवळ संशयित आरोपी आनंद उर्फ राहुल गोपाळराव सोनवणे (पाटील) (वय-२२) रा. लालचंदनगर, वरूड रोड, शिंदखेडा जि.धुळे याला अटक केली.