यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या विवाहितेला दत्तक पुत्र जेठाणीला देणे आणि माहेरहून एक लाख रूपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील साकळी येथील माहेर असलेल्या हिनाबी शेख इम्रान,यांचा विवाह पाच वर्षांपुर्वी गुजरात राज्यातील भाटेना येथील शेख ईम्रान शेख फारूख यांच्याशी रितीरिवाज प्रमाणे झालेले आहे. दरम्यान तिन वर्षापर्यंत सासरच्या मंडळीकडून विवाहितेला चांगली वागणुक मिळाली. सुखी संसारच्या वेलीवर दोन मुले आहे. यात मोहम्मद हासीर (वय ४) आणि हाजीन (वय-२) अशी नावे आहेत. सासरच्या मंडळींनी हिनाबी यांनी आपला मोठा मुलगा जेठाणी आफरीन फीरदौस शेख आरिफ हिला दत्तक द्यावा असा तगादा लावला. मुलगा दत्तर देण्यास विवाहितेने नकार दिला. याचा राग आल्याने सासरची मंडळींनी त्रास देण्यास सुरूवात केली. दरम्यान एक वर्षापुर्वी सासरच्या मंडळीनी भाटेना उद्यना येथे हिनाबीच्या आई वडीलांशी वाद घालुन तिस माहेरी पाठवले. पुनश्च पाच महिन्यानंतर सासरची मंडळींनी साकळी समाज बांधवांच्या मध्यस्थीने विवाहितेस सासरी घेवुन गेले व तेव्हा पासुन विवाहितेचा पती ईम्रान शेख यांनी व सासु सईदाबी शेख, सासरे फारूख शेख, मोठे जेठ आरीफ शेख, लहान जेठ शाहरूख शेख, मोठी जेठाणी आफरीन शेख, लहान जेठाणी समरीन फिरदौस शेख सर्व राहणार भाटेना ( गुजरात ) यांनी संगनमताने मारहाण करीत तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात पतीसह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.