जुन्या वादातून मानेवर ब्लेडने वार केल्या तरूण गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी तरूणाला बेदम मारहाण करून त्याच्या मानेवर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास मुकुंदा साळुंखे (वय-३२) रा. धामणगाव वाडा, समता नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. विकास साळुंखे हा रविवारी १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घरी जात असतांना घराकडे जात असतांना स्तंभाजवळील चौकात आबा खर्चाणे हो झोपलेला होता. त्याला झोपेतून उठविले असता त्याने मागील भांडणाच्या कारणावरून विकासच्या कानशिलात लगावली. त्यावर विकासने देखील त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर विकास हा घरी गेल्यानंतर आबा खर्चाणे, त्याचा मोठा भाऊ बापू खर्चाणे आणि विकी कोळी सर्व रा. समता नगर, जळगाव हे विकासच्या घरी येवून त्याला बेदम मारहाण केली. यात एकाने हातातील ब्लेडने विकासच्या मानेवर वार करून गंभीर जखमी केले. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी विकास साळुंखे यांने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आबा खर्चाणे, बापू खर्चाणे आणि विकी कोळी सर्व रा. समता नगर, जळगाव यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content