जामनेर तालुक्यातील पाळधी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना शनिवारी २० मे रोजीसायंकाळी घडली आहे. या हाणामारीत दोन्ही गटातील ४ जण जखमी झाले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात २२ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पाळधी गावात राहणारे विकास शंकर पारधे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. विकास पारधे यांचा मुलगा दिपक यांच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून विकास पारधे, त्यांचा मुलगा विकास दिपक पारधे, नाना रामा बाविस्कर, मयूर विकास पारधे, समाधान सिताराम बाविस्कर आणि लिलाबाई रामा बाविस्कर यांना गावात राहणारे संदीप दामू ठाकरे, राहूल पंडीत भोई, दिलीप भिल, दिपक भानूदास धनगर, रमेश भानुदास धनगर, सुभाष भिल, मनोज उत्तम गायकवाड, अशोक धोंडू धनगर, सुनिल आत्माराम ठाकरे, शिवाजी भिल, गिताबाई भिल, सखूबाई भोई, सुमनबाई बाबुलाल भोई, हिराबाई भानूदास धनगर सर्व रा. पाळधी ता.जामनेर यांच्या जोरदार हाणामारी झाली. यात मारहाणीत दोन्ही गटातील चारजण गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान रविवारी २१ मे रोजी दोन्ही गटातील सदस्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.