पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून रस्ता आडवून वृध्दाला धक्काबुक्की करू छातीत मारहाण केल्याची घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ एप्रिल रोजी रात्री उशीरा पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, शेंदुर्णी गावातील दत्त नगरात पंडितराव यादवराव जोहरे (वय-६८) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता पंडीतराव जोहरे हे नातूला दुचाकीवरून दवाखान्यात जात होते. त्यावेळी गावात राहणारा शैलेश सुकलाल गुजर याने त्यांचा रस्ता आडविला. आणि पुढे जाण्यास मज्जाव करून फुकटचे आंबे हवे आहेत का असे बोलून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर छातीत मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर पहूर पोलीस ठाण्यात वृध्दाने धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी शैलेश सुकलाल गुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरनारे करीत आहे.