जुन्या भांडणाच्या कारणावरून बापलेकाला दोघांकडून बेदम मारहाण

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारातील शेतात मागील भांडण्याच्या कारणावरून एका वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलाला दोन जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात सोमवार १३ मार्च रोजी रात्री ११ वाजता दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, चंद्रकांत श्रीराम शर्मा (वय-७१) रा. चंद्रमणी बंगला, भडगाव रोड, पाचोरा हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ मार्च रोजी दुपारी ४ वाजता चंद्रकांत शर्मा हे त्यांचा मुलगा अरुण चंद्रकांत शर्मा यांच्यासोबत पाचोरा तालुक्यातील आर्वे शिवारातील शेतात गेले होते. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून मानसिंग प्रतापसिंग सिद्धू आणि बलवीरसिंग प्रतापसिंग सिद्धू दोन्ही राहणार शिवाजीनगर पाचोरा यांनी चंद्रकांत शर्मा आणि त्यांचा मुलगा अरुण शर्मा यांना हातातील लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून हातापायाला गंभीर दुखापत केली आणि दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर चंद्रकांत शर्मा हे मुलासह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. उपचार घेतल्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मानसिंग प्रतापसिंग सिद्धू आणि बलवीरसिंग प्रतापसिंग सिद्धू दोन्ही राहणार शिवाजीनगर पाचोरा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गंरगे करीत आहे.

Protected Content