जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा येथील पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या आवारात जुन्या पेन्शन योजनेसाठी सातव्या दिवशी कर्मचाऱ्यांनी ‘एकच मिशन,जुनी पेन्शन’ च्या घोषणा बाजी देत शासकीय कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.

 

या आंदोलनास उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना यांनी पाठींब्याचे पत्र देऊन पाठिंबा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाइस चेअरमन विलास जोशी, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, माजी शहराध्यक्ष सतीष चौधरी यांनी ठिय्या आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दिला. आंदोलन कर्त्या महिलांनी थाळी वाजवून आंदोलन केले.

 

आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार गोराडे, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर डी पाटील, मध्यवर्ती महसूल संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब नेटके, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर पाटील, सचिव नितीन बोरसे, तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष नदिम शेख,नकुल काळकर, संदिप चव्हाण, महसूल संघटनेचे तालुकाध्यक्ष वरद वाडेकर, शिपाई संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश चौधरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या १५ संघटना, उर्दू शाळा, माध्यमिक शाळांचे शिक्षक शिक्षिका आरोग्य विभाग, मंडळ अधिकारी संघटना, कोषागार विभाग पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजकुमार घस, दिलीप सुरवाडे, कार्यालयीन कर्मचारी सहभागी झाले होते.

 

ग्रामीण भागातील नागरिक हैराण

संपूर्ण राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संप सुरू केल्याने व सद्य स्थितीत मार्च महिन्यात अनेक बॅंका, पतसंस्था, सहकारी सोसायट्या या कर्ज वसुली सुरू असून कर्जांचे रिनीवल करावयाची लगबग सुरू आहे मात्र यासाठी स्टंप लागत असल्याने कोषागार कार्यालयातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले असल्याने स्टंप विक्रेत्यांकडे स्टंप मिळत नसल्यामुळे नागरीक नविन कर्ज,  , पतसंस्थांचे कर्ज हातात पैसा असूनही रिनीवल करणे व नविन कर्ज घेण्यापासून वंचित राहत आहेत, याशिवाय तलाठी व ग्रामसेवक तहशिलदार, प्रांताधिकारी कार्यालयातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले असल्याने ७/१२ उतारे, खाते उतारे, घराचे उतारे, कर्जासाठी लागणारे व विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळविण्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र व अॅफविडेट केले जात नसल्याने नागरीक त्रस्त झाले असून ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या विविध कर वसुली ठप्प झाल्याने, पाणी पुरवठा योजना,गावात साफसफाईची कामे,गटारी काढणे या सारखी कामे खोळंबल्याने नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

Protected Content