बोदवड प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज जुनोने प्रकल्पाची पाहणी करून येथे कार्यकर्त्यांना मेळाव्यात मार्गदर्शन केले.
बोदवड उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यातील जुनोने धरणाचे काम सुरू आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज या कामाची पाहणी केली. यानंतर प्रकल्पस्थळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, या प्रकल्पासाठी ६५० कोटींचा निधी मिळाल्यामुळे २०२१ पर्यंत योजनेचे काम पूर्ण होईल. यामुळे बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, मोताळा आदी १०१ गावांमधील २२ हजार २२० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी डॉ.राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, आर.ओ.वाघ, शुभांगी भोलाणे, गणेश पाटील, प्रिती पाटील, अनिल येवले, नजमा तडवी, निवृत्ती पाटील, वैशाली तायडे, भागवत टिकारे, कैलास चौधरी, रामदास पाटील, किशोर गायकवाड उपस्थित होते.