चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील इच्छापूर्ती मंदिराजवळील एका हॉटेलच्या पाठीमागे अवैध जुगार अड्डा सुरू असल्याचे कळताच नाशिकच्या पथकाने रात्री १ वाजता सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी सव्वा लाख रोकडसह एकूण ३ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. व १२ जणांना ताब्यात घेत १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले.
याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्ह्यात सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले आहे. हे आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांनी एका विशेष पथकाची निवड केली. त्याअनुषंगाने सदर पथक पेट्रोलिंग करत असताना पो.नि बापू रोहम यांना गुप्तहेरांकडून चाळीसगाव तालुक्यातील करगाव रोडवरील इच्छापूर्ती मंदिराजवळील रूबाबदार हॉटेलच्या पाठीमागे अवैध ५२ पत्याचा जुगार अड्डा सुरू असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यावर पथकाने रात्री १ वाजताच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकून १,३३,६२० रूपये रोक, दोन ५२ पत्याची कॅट, १२,५०० रू. कि.चे ११ मोबाईल फोन व २,२५,००० रूपये कि.च्या ११ मोटारसायकल असा एकूण ३,७१,१२० रूपये कि.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे तालुक्यात अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पो.हवा. सचिन धारणकर यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात म.जु.का.क १२ (अ) प्रमाणे १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकीचे सहा जण अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
तत्पूर्वी गुलाब भिमसिंग राजपूत (वय-५६), सोमनाथ महादू जाधव (वय-३५), विशाल राजेंद्र महाजन (वय-२९), शंकर किसन सोनार (वय-५२), कुणाल करणसिंग पाटील (वय-३३), सोनू आनंदा गवळी (वय-३६), राहूल ज्ञानेश्वर चौधरी (वय-२८), अजय सुरेश भावसार (वय-३३), कपील रामभाऊ पाटील (वय-३४), आब्बा लक्ष्मण चौधरी (वय-३३), हिम्मत दत्तात्रय चौधरी (वय-३८), भोजराज दत्तू सावळे (वय- २३) आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर भैय्या सुर्यवंशी, (पूर्ण नाव माहीत नाही), गंपू शेख, संजू घटी, सोनू उर्फ म्हश्या जाधव, महेश राजपूत, बापू मराठे सर्व रा. चाळीसगाव हे अजूनही फरार आहेत.
सदर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू रोहम, पोहेकॉ रामचंद्र बोरसे, पो.हवा सचिन धारणकर, पो.हवा शेख अहमद, पोना मनोज दुसाने, पोना प्रमोद मंडलीक, पोना कुणाल मराठे व पोकॉ मुकेश टांगोरे या पथकाने केली आहे.