मुक्ताईनगर प्रतिनिधी । कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या जिल्हा परिषद सभापतीच्या संपर्कात आलेल्या येथील एका मातब्बर नेत्याच स्वॅब सँपलचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
याबाबत वृत्त असे की, सोमवारी मुक्ताईनगर तालुक्यातील रहिवासी असणार्या जिल्हा परिषदेचे सभापती व त्यांच्या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला होता. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. यात तालुक्यातील एक मान्यवर पुढारी व त्यांच्या कुटुंबियांचे स्वॅब सँपल घेण्यात आले. यात संबंधीत नेता आणि त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला असून कुटुंबातील अन्य सदस्यांच्या चाचणीचे अहवाल अजून मिळालेले नाहीत.