Home प्रशासन जिल्हा परिषद जि. प. सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधीतून नायगावात बाक वितरण

जि. प. सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधीतून नायगावात बाक वितरण

0
34

यावल,  प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव येथे  जिल्हा परिषद सदस्या अरूणाताई पाटील यांच्या निधीतुन सार्वजनिक ठिकाणी ९ बाकांचे वितरण करण्यात आले.

 

नायगाव येथे ग्रामपंचायत व इन्सानियत ७८६ गृप यांच्या पदधिकारी यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा  जि. प. सदस्य अरुणाताई रामदास पाटील यांच्याकडे केला होता. यानुसार मार्गदर्शक आर. जी. पाटील (नाना) यांच्या सौजन्याने जि. प. सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधीतून  कब्रिस्थान व दर्गा परिसर व सार्वजनिक ठिकाणी एकूण नऊ बाक बैठकीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरम्यान, इन्सानियत ७८६ गृप व ग्राम पंचायत नायगाव यांचे परिसरातील ग्रामस्थ आणि गावातील जेष्ठ नागरीकांच्या वतीने या सामाजीक उपक्रमासाठी विशेष कौतुक होत आहे.

 


Protected Content

Play sound