जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ९७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात भडगाव तालुक्यातील सर्वाधीक २७ रूग्णांचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ९७ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक २७ रूग्ण भडगाव तालुक्यातील असून याच्या सोबत जळगाव शहर-७; जळगाव ग्रामीण-३; भुसावळ-५; एरंडोल-१२; चाळीसगाव-२; पाचोरा-९; यावल-४; चोपडा-६; जामनेर १०; अमळनेर-६; धरणगाव-५ व रावेर १ अशी रूग्ण संख्या असल्याचे या प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, आज कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाने जिल्ह्यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देखील या प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे. यात जळगाव शहरातील २८ वर्षाचा पुरूष आणि यावल तालुक्यातील ६८ वर्षांच्या महिलेचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.