Home Cities जळगाव जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत शांतता भंग प्रतिबंध कलम लागू

जिल्ह्यात ७ डिसेंबरपर्यंत शांतता भंग प्रतिबंध कलम लागू

0
47

 

जळगाव, प्रतिनिधी ।जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, सार्वजनिक शांततेचा भंग होवू नये. यासाठी जिल्ह्यात ७ डिसेंबर, पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) शांतता भंगास प्रतिबंध कलम लागू करण्यात आले असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी कळविले आहे.

शांतता भंगास प्रतिबंध कलमाच्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास, स्थानिक पोलीस स्टेशन कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना तसेच शासकीय कार्यक्रम, लग्न मिरवणुका,धार्मिक मिरवणुका व प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound