जळगाव प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात १४ कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यामुळे एकूण रूग्ण संख्या ५७१ वर पोहचली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री उशीरा एका प्रेस नोटच्या माध्यमातून रूग्णसंख्येचे अपडेट दिले आहे. यानुसार- पाचोरा, रावेर, सावदा, भुसावळ, जळगाव येथील 106 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त. यापैकी 92 अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर 14 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये पाचोराचे तीन, निभोंरासीम येथील तीन, रावेर येथील एक, भोकर येथील तीन, भुसावळ येथील एक, जळगाव शहरातील डहाके नगर, कोळीवाडा, पोलीस लाईन येथील प्रत्येकी एक व्यक्तींचा समावेश आहे.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 571 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 233 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर 68 रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.