जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या तीन हजारावर पोहचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात १० दिवसाचा सक्तीचा लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी अल्पसंख्यांक सेवा संघटनेने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अत्यावश्यक सेवा ते फक्त औषधी मेडीकल मोठी व दवाखाने वगळण्यात यावे. दारूचे अड्डे, बिअरबार, लाईन मोठी दुकाने हे सर्व १०० टक्के बंद करण्यात यावे. गेल्या ९० दिवसाचा सर्वात जास्त पैसा जर कोणी कमवला असेल तर ते दारूचे अड्डे, बिअर बार वाल्यांनी कमविले आहे. त्यांचा काळा पैसा पोलीसांनी धाड टाकून काढण्यात यावा व यामुळेच जास्त प्रमाणात कोरोना प्रादुर्भाव वाढलेला आहे. १० दिवस सक्तीने जनता कर्फ्यू केल्यास मालेगाव व इतर जिल्ह्यात जसे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाची मोलाची कामगिरीचा उपयोग झाला तसाच जळगांव जिल्हा प्रशासनाने सक्तीचे लॉकडाऊन करावे अशी मागणी केली आहे. या निवेदनावर यावेळी अल्पसंख्यांक सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष जहांगीर खान, जिल्हाध्यक्ष याकुब दाऊद खान, जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.