जळगाव, प्रतिनिधी । कोराना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात २३ मार्च, २०२० पासून २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. मात्र संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी यांनीपोलीस विभागास दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभागाने जिल्हाभरात धडक मोहिम राबवून जिल्ह्यात १४२ वाहने जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंमलात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेत विनाकारण वाहनांसह फिरून अडथळा निर्माण करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा एक भाग म्हणून जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दुचाकी-132, चारचाकी-3 तर तीनचाकी-7 अशी एकूण 142 वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे.
जप्तीची कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचा प्रकार व ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत जप्तीची कारवाई केली गेली त्या पोलीस स्टेशनची माहिती पुढीलप्रमाणे आहेत. एम.आय.डी.सी,जळगाव पोलीस स्टेशन-दुचाकी-40, चारचाकी-1, जळगाव शहर पोलीस स्टेशन दुचाकी-16, जिल्हापेठ पोलीस स्टेशन-दुचाकी-4, तीनचाकी-6, रामानंद पोलीस स्टेशन- तीन चाकी-1, नशिराबाद पोलीस स्टेशन- दुचाकी-12, चोपडा पोलीस स्टेशन- दुचाकी-1, अमळनेर पोलीस स्टेशन-दुचाकी- 2, मारवड पोलीस स्टेशन-दुचाकी-7, पारोळा पोलीस स्टेशन- दुचाकी-9, एरंडोल पोलीस स्टेशन- दुचाकी- 16, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन- दुचाकी-2, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन- दुचाकी-2, भडगाव पोलीस स्टेशन- दुचाकी- 15 कासोदा पोलीस स्टेशन-दुचाकी-1 मेहुणबारे पोलीस स्टेशन-दुचाकी-4, चारचाकी-2. अशाप्रकारे जिल्ह्यात दुचाकी 132, चारचाकी 3 तर तीनचाकी 7 वाहने जप्त करण्यात आली आहे. नागरिकांनी नोंद घेवून विनाकारण वाहनांसह किंवा वाहनांशिवायसुध्दा बाहेर फिरू नये आणि वाहने जप्तीसारखी कारवाई टाळावी. तसेच कोरोना विषाणूला रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ पंजाबराव उगले यांनी केले आहे.