Home Cities जळगाव जिल्ह्यात रासायनिक खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता (व्हिडीओ)

जिल्ह्यात रासायनिक खतांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता (व्हिडीओ)

0
36


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी।  जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा कमी होत आहे. व खतांची उपलब्धता कमी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेवून खुलासा दिला आहे.

 

संभाजी ठाकूर म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारच्या रासायनिक खते कमी पडणार नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी  सध्या ४० हजार  मेट्रीक टन खतांचा साठा शिल्लक आहे. मात्र, शेतकरी बांधवांनी विशिष्ट एकाच खताची मागणी करु नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, जळगाव जिल्हा डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष व माफदा  पुणे संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ आदी उपस्थित होते.

श्री. ठाकूर पुढे म्हणाले की,जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस कृभको व इतर कंपन्यामार्ङ्गत २००० मेट्रीक टन,१०.२६.२६ इङ्गको कंपनी मार्ङ्गत ०२.१२.२०२२ रोजी ३७०० मेट्रीक टन डीएपी,आर.सी.एङ्ग.कंपनीमार्ङ्गत आज रोजी २१०० मेट्रीक टन १५:१५:१५ खत प्राप्त होणार आहे. तसेच शेतकरी बांधवांनी उपलब्ध असलेल्या सरळ खतांचा (युरिया,एस.एस.पी.पोट्याश) वापर करुन घणच्या घरी मिश्र खते तयार करुन त्याचा वापर करावा. जळगाव जिल्हा रासायनिक खते वापरण्यात देशात दुसरा तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.त्यादृष्टीकोनातून शेतकर्‍यांनी रासायनिक खतांचा वापर कमीत कमी करावा आणि शेण खत किंवा मिश्र खतांचा वापर करुन जमिनीचा पोत राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 

 कृषिक अॅपद्वारे पाहता येईल विक्रेत्याकडील खतांचा साठा 

जिल्ह्यातील कृषी केंद्रात विक्रीसाठी विक्रेत्यांकडे उपलब्ध खातांचा साठा बघण्यासाठी कृषिक अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी मोबाईलमधील प्ले स्टोेअरमध्ये जावून कृषिक अॅप डाऊनलोड करुन जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांकडे कोणत्या खताचा साठा किती प्रमाणात उपलब्ध आहे याची माहिती शेतकर्‍यांना सहज उपलब्ध होईल. त्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कृषिक अॅप डाऊनलोड करुन घ्यावा, असे आवाहन जि.प.कृषी विकास अधिकारी वैभव शिेंदे यांनी केले.

 

डॅश बोर्डवर खताची नोंद करण्याचे आवाहन 

जिल्ह्यातील कृषी केंद्र दुकानदारांनी आपल्याकडे उपलब्ध साठ्याची अचूक माहिती ठेवण्यासाठी वेळीच्या वेळी डॅश बोर्डवर खताची नोंद करुन घ्यावी. तसेच शेतकर्‍यांनी खरेदी केलेल्या खतांची पॉझ मशिनवर अंगठा घेऊन नोंद घेतल्यास जिल्हा कृषी विभागाच्या  डॅश बोर्डवर खताची अचूक माहिती मिळते. तसेच कृषी विभागाला देखील कोणत्या खतांचा साठा मागवताना अडचणी निर्माण होणार नाही. तसेच विक्रेत्यांसह  शेतकर्‍यांनाही  पाहिजे त्या खतांची उपलब्धता लवकर होईल, यादृष्टीकोनातून कृषी विक्रेते दुकानदारांनी काम करावे, असे आवाहन जळगाव जिल्हा डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष व माङ्गदा पुणे संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी केले.

 


Protected Content

Play sound