जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोविड रुग्णालयाने पाठविलेल्या २७३ अहवाल पैकी २७० अहवाल निगेटिव्ह तर ३ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या २७३ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी २७० व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर ३ व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ४७१ इतकी झाली आहे.