जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा किमान पातळीवर (व्हिडीओ)

 

जळगाव : प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा किमान पातळीवर आला आहे आणि मृत्युदर १ . ७ टक्क्यांवर आल्याचाही दिलासा  मिळाल्याचे सध्या समाधान आहे असे आज  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले .

 

जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीबद्दल लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना  जिल्हाधिकारी अभिजित राऊत पुढे म्हणाले की , सध्या जिह्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी झाली आहे एप्रिल महिन्यात आणि त्यातही १४ एप्रिलच्या दरम्यान ही संख्या दैनंदिन १४ हजारांपर्यंत गेली होती . ती आता दोन अंकी संख्येपर्यंत कमी झाली आहे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दरही कमी आहे आता मृत्यू दर १ . ७ टक्क्यांवर आला आहे तरीही गाफील राहून चालणार नाही प्रत्येकाला नियम पाळावेच लागणार आहेत आता या पुढच्या काळासाठी नियोजन सुरु आहे प्रशासन तिसरी संभाव्य लाट थोपविण्याच्या दृष्टीने नियोजन करत असले तरी त्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे त्याचवेळी जिल्ह्यात ७० टक्के लसीकरण पूर्ण होईल त्यावेळी बऱ्यापैकी दिलासा मिळालेला असेल अशी आशा आहे सध्याच्या या मधल्या काळात पुरेसे अंतर , मास्क वापरने आणि हातांची स्वच्छता हे नियम कुणालाच दुर्लक्षित करता येणार नाहीत जिल्ह्यात ४०० ते ५००  नमुन्यांचे  सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते ते सर्वेक्षण तांत्रिकदृष्ट्या निकोप झाले असेल   तर जिल्ह्यात ५१ टक्के लोकसंख्येची रोग प्रतिकारशक्ती उत्तम असल्याचे म्हणता येईल त्यामुळे आता तिसऱ्या लाटेचा धोका दूर सारण्याच्या दृष्टिने नियोजन करणे महत्वचे  आहे , असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी  स्प्ष्ट  केले .

 

Protected Content