जळगाव सचिन गोसावी । जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी दुसर्या लाटेची शक्यता असून आपण सर्वांच्या मदतीने यावर मात करणार असल्याचा आशावाद आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिसून आले आहे. तथापि, अलीकडच्या काळातील रूग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता दुसर्या लाटेचा धोका अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. यामुळे रूग्ण संख्येत वाढ होण्याची अर्थात कोरोनाच्या दुसर्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक त्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज याचीच माहिती जिल्हा वासियांना दिली.
लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांच्यासह नागरिकांनी दिलेल्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेचा आपण बर्यापैकी प्रतिकार करण्यात यश संपादन केले आहे. या पार्श्वभूमिवर, आता दुसरी लाट आली तरी तिला थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. आधीच्या रूग्णसंख्येपेक्षा २० टक्के जास्त रूग्ण आढळून आले तरी त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार करण्यासाठी सर्व सुविधा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. अर्थात, यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे सहकार्य देखील अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
खालील व्हिडीओत पहा….जिल्हाधिकारी नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/483744212592279