जिल्ह्यात इथेनॉल निर्मिती कारखान्याची उभारणी

  वरणगाव : प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात राजनंदिनी बायोडिझेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत शुगर बीटपासून इथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारला जात आहे , अशी माहिती वासुदेव तोतडे यांनी आज एका शेतकरी परिसंवादात दिली 

 

तरुणांना यापासून रोजगार तर मिळणारच आहे . इथेनॉल निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल म्हणजे  शुगर बीटचे  हेक्टरी 70 ते 80 टन उत्पादन होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी होणार आहे . असे या परीसंवादांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वासुदेव तोताडे यांनी सांगितले .

 

जागतिक बाजारपेठेत रोज वाढत जाणाऱ्या  पेट्रोल डिझेल भावामुळे  सर्वसामान्य भारतीयांना याचा आर्थिक फटका रोज जाणवत असून या अनुषंगाने भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या तेलावर नियंत्रण आणि कपात करण्यासाठी आत्मनिर्भर योजनेअंतर्गत तरुणांच्या हाताला काम व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारकडून शुगर बीट पासून इथेनॉल निर्मितीचे कारखाने भारतात ठीकठिकाणी उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे , असेही ते म्हणाले .

 

देशात आयात होणाऱ्या तेलावर सरकारचा प्रचंड पैसा खर्च होत आहे . त्यामुळे भारतातील पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहे . या भाववाढीमुळे प्रचंड महागाईलाही सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागत आहे .या गोष्टीवर उपाय म्हणून भारत सरकारने शुगर बीटपासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले असून निर्माण होणारे इथेनॉल पेट्रोल डिझेलमध्ये 20 टक्के मिश्रन करण्यासाठी भारत सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर तर कमी होतीलच परंतु आत्मनिर्भर योजनेअंतर्गत तरुण व नविण उद्योजकांना या इथेनॉल  निर्मितीच्या कारखान्यांमुळे संधी प्राप्त होणार आहे , असेही त्यांनी सांगितले .

 

हा परिसंवाद भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे मराठा मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला या परिसंवादात शेतकरी – गोकुळ जोगी , कडू राजपूत ( धरणगाव ) , अविनाश पाटील  , विठ्ठल चौधरी , भगवान पाटील ( अंजनसोडा ) , गगन खडगे ( जळगाव ) , हेमंत चौधरी (सांगवी ) सुनील चौधरी (वरणगाव ) , दीपक चौधरी (पुणे ) ,  रवींद्र कोल्हे ( फुलगाव ), गोपाल गावंडे  , सुभाष पोद्दार ( वरणगाव ) , संतोष चौधरी ( खडका )  आदी शेतकरी उपस्थित होते . आभार अनिल पाटील यांनी मानले .

 

Protected Content