जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ७१ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर आज ३६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजची आकडेवारी
जळगाव शहर-४६, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-२, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-२, जामनेर-२, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-०, बोदवड-४ असे एकुण ७१ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
आज आलेल्या अहवालाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ५७ हजार ५७२ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ७८९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर विविध कोवीड रूग्णालयात ४१६ बाधित रूग्ण उपचार घेत आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.