जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ५३ रूग्ण बाधित आढळले आहे. तर ३१ रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यात आकडेवारी निरंक आले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर- १८, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१५, अमळनेर-२, चोपडा-१, पाचोरा-१, भडगाव-०, धरणगाव-०, यावल-१, एरंडोल-०, जामनेर-१, रावेर-१, पारोळा-५, चाळीसगाव-२, मुक्ताईनगर–४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण ५३ रूग्ण बाधित आढळून आले आहे.
आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात एकुण ५४ हजार ३८३ रूग्ण कोरोनाबाधित झाले आहे. त्यापेकी ५२ हजार ५५६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून ५३५ रूग्ण उपचार घेत आहे. आज एका रूग्णाचा मृत्यू झाला असून एकुण १ हजार २९२ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.