जिल्ह्यात आज ४६७ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह; तर ७७१ रूग्ण कोरोनामुक्त

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालातून जिल्ह्यात ७७१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहे. तर जिल्ह्यात आज ४६७ रूग्ण कोरोना बाधित निष्पन्न झाले. आजच्या अहवालात जळगाव शहरातून १८४ बाधित रूग्ण आढळले.

कोरोनाच्या संसर्गातून बरे होणार्‍यांची संख्या आता गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बाधितांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. आज जिल्ह्यात नवीन ४६७ कोरोना बाधीत आढळून आले आहे. मात्र, यासोबत आज जिल्ह्यातील ७७१ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजची आकडेवारी
जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर- १८४, जळगाव ग्रामीण- १८, भुसावळ-३०; अमळनेर-३९; चोपडा-१८; पाचोरा-१७; भडगाव-२७; धरणगाव-५; यावल-७; एरंडोल-५; जामनेर-३३; रावेर-३०; पारोळा-२५; चाळीसगाव-८; मुक्ताईनगर-१०; बोदवड-१० आणि इतर जिल्ह्यांमधील २ असे एकुण ४६७ रूग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, आज ७७१ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्‍यांची संख्या ३७,५५२ इतकी झाली आहे. तर आज १० मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११५५ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाचे सक्रीय रूग्ण ८०३५ इतके आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content