जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून कोवीड रूग्णांची आकडेवारी आज सायंकाळी प्राप्त झाली आहे. यात जिल्ह्यात आज ४४३ कोरोना बाधित रूग्ण आढळून आलेत. आज आढळून आलेल्या अहवालात जामने आणि मुक्ताईनगर तालुक्यात रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज ७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला तर आजच ४६५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
आजची आकडेवारी
जळगाव शहर -६३, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-२०, अमळनेर-२२, चोपडा-१४, पाचोरा-४, भडगाव-६, धरणगाव-३, यावल-७, एरंडोल-७, जामनेर-११३, रावेर-१३, पारोळा-३, चाळीसगाव-१५, मुक्ताईनगर-१४१, बोदवड-० आणि अन्य जिल्हा ३ असे एकुण ४४३ रूग्ण आज आढळून आले आहे.
तालुकानिहाय आडेवारी
जळगाव शहर -११,४४३, जळगाव ग्रामीण-२४५४, भुसावळ-३५४४, अमळनेर-४२३३, चोपडा-४२१८, पाचोरा-१८७४, भडगाव-१८२८, धरणगाव-२१४१, यावल-१६४७, एरंडोल-२७७८, जामनेर-३८३८, रावेर-२०७०, पारोळा-२४३८, चाळीसगाव-३३२७, मुक्ताईनगर-१६३४, बोदवड-७९४ आणि अन्य जिल्हा ४०४ असे आज एकुण ५० हजार ६६५ रूग्ण झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस कमी होत असल्याने जिल्ह्यासाठी दिलासादायक आहे. रिकव्हरीचा रेट हा ९०.३५ टक्क्यांपर्यंत आला आहे. जिल्ह्यात एकुण ५० हजार ६६५ रूग्ण आढळून आले असून ४५ हजार ७७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ७ रूग्णांचा मृत्यू झाला असून एकुण जिल्ह्यात १२१८ रूग्णांची मृत्यूचा आकडा पोहचला आहे. तर जिल्ह्यात आता ३ हजार ६७२ रूग्ण कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.