जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात आज जिल्ह्यातून ८८९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर जिल्ह्यात ३२२ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे. जिल्ह्यातून रिकव्हरी रेट ८६.७६ टक्क्यांपर्यंत आला आहे.
आजची आकडेवारी
आजच्या अहवालात जळगाव शहरासह मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यात संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील तालुक्यांचा विचार केला असता जळगाव शहर-६९, जळगाव ग्रामीण-९, भुसावळ-२८; अमळनेर-१४; चोपडा-२५; पाचोरा-१७; भडगाव-१६; धरणगाव-४; यावल-१४; एरंडोल-५; जामनेर-६; रावेर-५; पारोळा-६; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर-७७; बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यांमधील २ असे एकुण ३२२ रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात एकुण रूग्ण संख्या ४८ हजार ८०६ वर पोहचली आहे.
दरम्यान, आज ८८९ रूग्ण बरे झाले असून आजवर बरे होणार्यांची संख्या ४२ हजार ४५४ इतकी झाली आहे. तर आज १ मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ११९१ वर पोहचला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार २७२ रूग्णांवर उपचार सुरू आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews