जळगाव प्रतिनिधी । आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात तब्बल १७० कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात भडगावात सर्वाधीक ४३ पॉझिटीव्ह असल्याचे दिसून झाले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची माहिती जाहीर केली आहे. यानुसार जिल्ह्यात आज तब्बल १७० रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक रूग्ण संख्या ४३ ही भडगावात आहे. यात भडगाव तालुक्यातील आमडदे येथील सर्वाधीक रूग्ण आहेत. दरम्यान उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता खालील प्रमाणे कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
जळगाव शहर-२३ आणि जळगाव ग्रामीण-५; एरंडोल-२०; भुसावळ-०८; चाळीसगाव-०२; पाचोरा-४; चोपडा-३; जामनेर-९; अमळनेर-१५; धरणगाव-१२; मुक्ताईनगर-७; पारोळा-१; रावेर-७; यावल-१४ असे रूग्ण आढळून आले आहेत.